सह्याद्रिनगर, उदघाटन समारंभ सभा मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार (मुख्यमंत्री) यांचा अध्यक्षते खाली पार पडली (४ नोव्हेंबर १९७९).
संस्थेची वसाहत सह्याद्रि नगरच्या उदघाटन प्रसंगी भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान मा. ना. श्री यशवंतरावजी चव्हाणसाहेब, कामगार नेते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. बाबुराव जाधव, श्री. अनंतराव कडवं, श्री. गणपतराव जाधव व इतर मान्यवर (४ नोव्हेंबर १९७९)
संस्थेची वसाहत सह्याद्रि नगरच्या उदघाटन प्रसंगी भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान मा. ना. श्री यशवंतरावजी चव्हाणसाहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार, मा.ना.श्री. प्रतापराव भोसले, कामगार नेते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. बाबुराव जाधव, श्री. अनंतराव कडवं,श्री. गणपतराव जाधव व इतर मान्यवर (४ नोव्हेंबर १९७९)
कामगारांना स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी महाराष्ट्र शासनाचे फार मोलाचे सहकार्य लाभले आहे. भारताचे उपपंत्तप्रधान मा.ना.श्री यशवंतरावजी चव्हाण, माजी केंद्रीय व कृषी मंत्री मा.ना.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.ना.कै. शंकरराव चव्हाण, मा.ना.कै. वसंतराव दादा पाटील, माजी गृहमंत्री मा.ना.कै. बाळासाहेब देसाई, माजी विधानसभा अध्यक्ष कै. शंकरराव जगताप, माजी सहकार मंत्री मा.ना.कै.विलास काका उंडाळकर यांचे घर बांधणी प्रकल्पासाठी चांगले सहकार्य लाभले आहे.
श्री कापड बाजार मराठा कामगार मंडळाने सर्व कार्मगारांना व कार्यकर्त्यांना संघटित करून घरबांधणी प्रकल्पास मूर्त स्वरूप देण्याकरिता अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे, त्याच बरोबर दि सह्याद्रि सहकारी बँक लि. ने स्वतःची शाखा सहयद्रि नगर मध्ये उघडून नगरातील लोकांची बँकिंग ची सोय केली आहे. कापड बाजार कामगार सेवा सोसायटीने नगरामध्ये सरकारमान्य धान्य दुकान व पिठाची गिरणी चालवून रहिवाश्याचा गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत आहे.